नाशिकमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद

विविध दुरुस्तीच्या कामांमुळे गुरुवार, 9 जुलै रोजी संपूर्ण नाशिक शहरातील सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहील. तसेच शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

गंगापूर धरणाच्या रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीच्या 132 केव्ही (सातपूर) व 132 केव्ही (महिंद्रा) या दोन एक्स्प्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी 33 केव्ही वीजपुरवठा कार्यान्वित आहे. संबंधित ओव्हरहेड लाइन फिडर खतीब फार्म ते आर्किटेक्चर कॉलेजदरम्यान केबल टाकून भूमिगत करण्यात येणार आहे. महावितरण हे केबल जोडणीचे काम करण्याकरिता गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत वीजपुरवठा बंद ठेवणार आहे. तसेच पाथर्डी फाटा येथे पाणीपुरवठा वितरण विभागामध्ये व्हॉल्व्ह बसविण्यासाठी मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे गंगापूर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे धरण पंपिंग स्टेशन येथून पाणी उचलले जाणार नसल्याने गुरुवारी नाशिक शहरातील सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे कळविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या