नाशिकमध्ये नऊ जणांचा अकस्मात मृत्यू

 छातीत दुखून, श्वास घेण्यास त्रास होवून, तसेच बेशुद्ध पडल्याने शहरात बुधवारी एकाच दिवशी नऊ जणांचा मृत्यू झाला. सातपूरच्या मनझिप कोर जगझिप सिंग (49) यांना मंगळवारी रात्री छातीत दुखून श्वास घेण्यास त्रास होवू लागला. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता बुधवारी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. सातपूरचे संजू महादू भुजाड (26) यांचाही छातीत कळ येवून, श्वास घेण्यास त्रास होवून मृत्यू झाला. नाशिकरोडचे नितीनकुमार जाधव (39) हे सकाळी घरी चक्कर येवून पडले. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जेलरोडच्या राजेंद्र सूर्यभान मालकर (43), कोणार्कनगरच्या शारदा यशवंत दलाल (63) व मोतीवाला कॉलेज येथील किशोर भागचंद्र हिरण (46) यांचा श्वास घेण्यास त्रास होवून मृत्यू झाला.

आपली प्रतिक्रिया द्या