हुती बंडखोरांचा तेलवाहू जहाजावर हल्ला
येमेनमधील बंडखोर गट ‘हुती’ने लाल समुद्रात तणाव निर्माण केला आहे. हुतीच्या बंडखोर तरुणांनी 10 लाख बॅरल तेल नेणाऱया जहाजाला स्पह्टांनी उडवले. या घटनेचा व्हिडीओ कालपासून व्हायरल होतोय. त्यामध्ये जहाजावर आग लागल्याचे दिसत आहे. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जातेय. ग्रीक देशाचा ध्वज असलेल्या या तेलवाहू जहाजातून मोङ्गय़ा प्रमाणात समुद्रात तेल गळती होऊ शकते. सर्वात व्यस्त अशा या जलमार्गात तेल गळतीमुळे पर्यावरणाला मोठी हानी होण्याची शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. इस्रायलशी संबंधित तेलवाहू जहाजांना हुती बंडखोर सातत्याने लक्ष्य करत आहेत. गाझा पट्टीतील युद्ध संपावे म्हणून जहाजांवर हल्ला करून इस्रायलवर दबाव टाकण्याचा हुतींचा डाव आहे.
हुती बंडखोरांनी केवळ
इस्रायलच नव्हे तर अमेरिका आणि ब्रिटनच्या जहाजांवरही हल्ले करायला सुरुवात केलीय. या दोन्ही देशांनी जलमार्गातील हुतींना रोखण्यासाठी जानेवारी महिन्यात संयुक्त मोहीम सुरू केली होती.
आसमंतात फायटर जेटचा थरार पुन्हा सुरू
तरंग शक्ती या आंतरराष्ट्रीय सराव शिबिराचा दुसरा टप्पा शुक्रवारपासून जोधपूर येथे सुरू झाला. 30 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या कालावधीत हवाई सराव शिबीर पार पडणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय फायटर जेटचा थरार रंगणार आहे. तरंग शक्तीमध्ये श्रीलंका एअरपर्ह्सचे सी- 130 जे एअरक्राफ्ट भाग घेईल. याआधी श्रीलंका फक्त निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार होती. मात्र आता श्रीलंकेने प्रत्यक्ष सहभाग घ्यायचे ठरवले आहे.
बाजार नव्या उच्चांकावर
शेअर बाजारात शुक्रवारी नवा उच्चांक पाहायला मिळाला. सेन्सेक्स 231 अंक वधारून 82,366 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीनेही नवा रेकॉर्ड बनवला. 84 अंकांनी वाढून निफ्टी 25,236 अंकावर बंद झाला. मिडक@प, स्मॉलक@प शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसली. सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एशियन पेंट्ससह 22 शेअर्स वाढीसोबत बंद झाले.
अबुधाबी एअरपोर्टवर फ्री बोर्डिंग सिस्टम
आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी प्रवाशांना 3 तास आधी पोहोचावे लागते. तर देशांतर्गत विमान प्रवासासाठी 1 तास आधी पोहोचावे लागते. परंतु आता अबुधाबी विमानतळावर एक नवीन डॉक्युमेंट फ्री बार्ंडग सिस्टम लावली जात आहे. यामुळे प्रवाशांना 3 तास आधी पोहोचण्याची गरज राहणार नाही. या सिस्टममध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून प्रवाशांची ओळख पटवली जाणार आहे. प्रवाशांना बार्ंडग वेळी तीन स्थानांवर फेसियल रिकग्निशनवरून जावे लागेल.
नॉर्वेची राजकन्या आज विवाहबंधनात
नॉर्वेची राजकुमारी मार्था लुईस अमेरिकन तांत्रिक डय़ुरेक वेरेटसोबत उद्या, शनिवारी लग्नबेडीत अडकणार आहे. नॉर्वेच्या एलेसंड शहरातील चर्चमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. समारंभाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांना या काळात मोबाईल पह्न किंवा पॅमेरा वापरू नका आणि लग्नाशी संबंधित काहीही सोशल मीडियावर पोस्ट करू नका, असे सांगण्यात आले आहे. मार्था लुईस 2019पासून 49 वर्षीय वेरेट यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांचा 2022मध्ये साखरपुडा पार पडला होता.
150 कर्मचाऱयांना सक्तीची रजा
स्पाईस जेट विमान कंपनीने आपल्या 150 कर्मचाऱयांना 3 महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. स्पाईस जेटने हा तडकाफडकी निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचाऱयांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या तीन महिन्यांत कर्मचाऱयांना पगारसुद्धा दिला जाणार नाही. कंपनीने पैसे वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे सांगितले जात आहे. स्पाईस जेटची सध्या केवळ 22 विमाने आहेत. उड्डाण आणि प्रवाशांमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे.
हिंदुस्थानातील फ्लाईटमध्ये इंटरनेट
हिंदुस्थानात विमानात आता इंटरनेट मिळू शकेल. हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्था इस्रोने सॅटेलाईट कम्युनिकेशन्सच्या फिल्डमध्ये काम करणारी प्रसिद्ध कंपनी वियासतसोबत हातमिळवणी केली आहे. ही कंपनी पॅलिपहर्निया बेस्ड कम्युनिकेशन कंपनी आहे. जी हिंदुस्थानात आकाशात इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध करण्यास मदत करणार आहे. या वर्षीच्या अखेरपर्यंत जीसॅट-20 लाँच करण्याची शक्यता आहे. हे एक हाय थ्रूपूट सॅटेलाईट आहे. याचे निर्माण इस्रोच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे.