राष्ट्रीय तिरंदाजावर भाजी विकण्याची आपत्ती

1088

नागपूरमधील युवा आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिटवर लॉक डाऊनमध्ये उपासमारीची वेळ आल्यानंतर आता झारखंडमधील राष्ट्रीय तिरंदाज सोनू खातून हिला आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी भाजी विकावी लागत आहे. नागपूरच्या `त्या’ अ‍ॅथलिटला शिवसेनेकडून मदत देण्यात आल्यानंतर आता त्याचीच पुनरावृत्ती झारखंडमध्ये होताना दिसत आहे. झारखंड सरकारकडून सोनू खातून हिला 20 हजार रूपयांची मदत देण्यात आली.

सोनू खातून हिने 2011 साली राष्ट्रीय स्कूल गेम्समध्ये कांस्य पदक जिंकले होते. त्यानंतर तिने राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपली चमक दाखवली. टाटा आर्चरी अ‍ॅकॅडमीतही ती तिरंदाजीचे धडे घेत होती. पण याचदरम्यान धनुष तुटल्यामुळे सोनू खातून हिला तिरंदाजीपासून दूर व्हावे लागले.

सोनूचे वडील मजूर असून आई घरामध्ये साफसफाईचे काम करते. पण कोरोनाच्या संकटामुळे वडीलांची नोकरीही गेली. आईवडीलांसह सोनू आपल्या दोन लहान बहिणींसोबत वास्तव्य करते. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिच्यावर भाजी विकण्याची आपत्ती ओढवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या