
बंगळुरूमधील रिचमंड सर्कल परिसरात एका रुग्णवाहिकेने तीन दुचाकींना धडक दिली. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर काही जण जखमी झाले. रुग्णवाहिकेने दुचाकीला तब्बल 50 मीटरपर्यंत ओढत नेले. शंकर असे रुग्णवाहिका चालकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ट्रॅफिक वेस्ट बंगळुरूचे डीसीपी अनुप शेट्टी यांनी दिली. चौकशीतून या घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात आहे.


























































