
केरळमधील तिरुवनंतपुरम येथे 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या आत्महत्येप्रकरणी निधीश मुरलीधरन याच्याविरुद्ध पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा अभियंता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इंस्टाग्रामवर 15 पानांचा आत्महत्येचा संदेश पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने लैंगिक शोषणाचा आरोप करत ‘एनएम’ हा शब्द वारंवार वापरला होता.