
सहलीवरून घरी परतत असतानाच बोलेरो कार आणि ट्रकची धडक झाल्याने अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यात अकलघरिया गावाजवळ रविवारी संध्याकाळी हा अपघात झाला. मृतांची ओळख पटवली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. कारमधील प्रवासी कोलकात्याचे रहिवासी आहेत. मध्य प्रदेशातील कान्हा राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन कोलकात्याला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी कारने बिलासपूरला जात होते. मृतांमध्ये तीन महिला, एक पुरूष आणि एका मुलाचा समावेश आहे.