
कश्मीरमध्ये हंगामातील पहिली बर्फवृष्टी झाल्यानंतर आता उत्तराखंडमधील पिथोरागढ जिह्यातील पंचचुली, हरदेवाल, नंदा देवी आणि नंदा कोट या उंच शिखरांवर, तसेच चमोलीतील बद्रीनाथ आणि हेमकुंडच्या उंच शिखरांवरही हलकी बर्फवृष्टी झाली आहे. पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे उंचावरील भागांत थंडीचा जोर वाढला आहे. या भागातील तापमान झपाट्याने कमी झाले आहे.

























































