झारखंडच्या सारंडा जंगलात IED स्फोट, दोन सीआरपीएफ जवान जखमी

झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील सारंडा जंगलात रविवारी शोध मोहिमेदरम्यान झालेल्या दोन आयईडी स्फोट झाले. या स्फोटांमध्ये कोब्रा बटालियनचे दोन सीआरपीएफ जवान गंभीर जखमी झाले आहेत. हे आयईडी माओवाद्यांनी पेरल्याचा संशय आहे. सीआरपीएफ बॅरेकमध्ये प्राथमिक उपचार दिल्यानंतर दोन्ही जवानांना पुढील उपचारांसाठी रांची येथील एका खाजगी रुग्णालयात एअरलिफ्ट करण्यात आले आहे.

पश्चिम सिंहभूमचे पोलीस अधीक्षक अमित रेणू यांनी दिलेल्या माहितीनुसार, सारंडा जंगलात माओवाद्यांविरुद्ध शोध मोहिम सुरू होती. या मोहिमेत कोब्रा बटालियनचे जवानही सहभागी झाले होते. यादरम्यान आयईडी स्फोट झाले. यात कोब्रा बटालियनचे दोन जवान आयईडी जखमी झाले. हेड कॉन्स्टेबल आलोक दास आणि शिपाई नारायण दास अशी जखमी जवानांची नावे आहेत.