राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनामुळे नेमबाजी या खेळाची एकही स्पर्धा अद्याप या वर्षी झालेली नाही. पण राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडिया (एनआरएआय) येत्या डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी पाऊल उचलणार आहे. 22 ऑक्टोबरला याबाबत निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. पण केंद्र सरकारच्या कोरोनासंबंधित नियमांचे पालन व स्पोर्टस् ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई) यांच्याकडून परवानगी या दोन गोष्टी या स्पर्धा आयोजनासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यामुळे सध्या तरी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह कायम आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

अडथळ्य़ांवर एक नजर
– राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी एनआरएआयसमोर काही अडथळे असणार आहेत. गेल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत जवळपास सात हजार स्पर्धक सहभागी झाले होते. आता कोरोनाच्या काळात मोठय़ा प्रमाणात स्पर्धकांना समावेश करता येणार नाही.
– राष्ट्रीय स्पर्धेआधी पात्रता फेरी होणेही आवश्यक असते, पण कोरोनामुळे या स्पर्धाही झालेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धांमधील निकालाच्या निकषावर खेळाडूंना थेट एण्ट्री द्यावी लागणार आहे.
– शॉटगन व रायफल/पिस्तोल या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा एकाच वेळी न घेता भिन्न तारखांमध्ये आयोजित करण्यात याव्यात. जेणेकरून स्पर्धेच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जाईल.