राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह तसेच राष्ट्रवादीच्या नागालँडमधील आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आज एकत्र सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र वेळेअभावी ही सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. आता या प्रकरणावर पुढील आठवडय़ात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी पक्षाच नाव आणि घड्याळ या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. हे प्रकरण निवडणूक आयोगापुढे आले असता आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी कॉँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.