निसर्गाचा वाटाडय़ा

1067

>> शुभांगी बागडे

हिंदुस्थानातील वन्यजीव संवर्धन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कामाची व्याप्ती असणारे नाव म्हणजे भाऊ काटदरे. मानवी हस्तक्षेपामुळे दुर्मीळ होणाऱया वन्यप्राणी प्रजातींचे संरक्षण आणि संशोधनामध्ये भाऊंचा मोलाचा वाटा आहे. ‘सह्याद्री निसर्ग मित्र’ या संस्थेच्या माध्यमातून गेली 25 वर्षं काम करताना समाजाचा दृष्टिकोन बदलण्याचे महत्त्वाचे कामही त्यांनी केले आहे.

निसर्गातील दुर्मिळ प्रजाती ज्या निसर्गाचे संतुलन राखण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात अशा प्रजातींना वाचवलं गेलं पाहिजे आणि यासाठी कायद्याचे संरक्षण मिळवले पाहिजे हा विचार रुजविणारे भाऊ काटदरे म्हणजे कोकणच्या पर्यावरण संवर्धन क्षेत्रातील आदराचं नाव. निसर्गाने भरभरून दिलेल्या कोकणात दुर्मिळ प्रजाती व पर्यावरण संवर्धनाचा विचार रुजवण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. चिपळूण आणि आजूबाजूच्या भागातील समुद्रकिनारे पिंजून वाढत भाऊंनी वेगवेगळ्या पर्यावरण संवर्धन मोहिमा राबवल्या. भाऊंच्या या कामाला त्यांच्या शिलेदारांनी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून साथ दिली.

दुर्मिळ वन्यजिवांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे उद्दिष्ट ठेवून भाऊंच्या प्रयत्नातून सह्याद्री निसर्ग मित्र ही संस्था 1992 मध्ये चिपळूण येथ आकारास आली. या संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणाचं नुकसान करणाऱया अनेक गोष्टींना आळा बसला. या गोष्टी केवळ थांबल्या नाहीत तर निसर्ग संवर्धनाचा मंत्रच भाऊंनी कोकणाला दिला असं म्हणावयास हरकत नाही. आज वेळास-आंजर्ले येथील कासव महोत्सव, खवले मांजर संरक्षण मोहीम, पाकोळी व पांढऱया पोटाचा समुद्री गरुड संरक्षण मोहीम अशा अनेक सफल मोहिमा सह्याद्री निसर्ग मित्र आणि भाऊंच्या नावे आहेत. गेली 25 वर्षे या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे हे काम सुरू आहे.

गुहागरमधील शिर हे भाऊंचे गाव. त्यांचे मूळ नाव विश्वास काटदरे मात्र त्यांना भाऊ याच नावाने सारे ओळखतात. भाऊंच्या वडिलांना निसर्गाविषयी फार ममत्व होते. केवळ आवड म्हणून नव्हे तर त्यांच्यातील संशोधकी वृत्तीचा कित्ता भाऊंनीही गिरवला. भाऊंचे वडील बीएनएचएसचे सदस्य. याबरोबरच पर्यावरणविषयक समृद्ध वाचन. निसर्गप्रेमाचे हे बाळकडू भाऊंमध्येही आलं.

भाऊंनी काम सुरू केलं ते निसर्गाप्रती जागरुकता निर्माण करण्याचं ध्येय समोर ठेवूनच. यामुळेच त्यांच्या शोधक नजरेतून अनेक पर्यावरणविषयक समस्या समोर आल्या. या क्षेत्राची भाऊंची पार्श्वभूमी नसली तरी कोणत्याही समस्येचा मुळापासून अभ्यास करण्याकडे त्यांचा कल होता. त्यांच्या कामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पांढऱया पोटाचा समुद्री गरुड दुर्मिळ झाल्याची माहिती त्यांच्यासमोर आली. या गरुडाबाबतची शास्त्र्ााrय माहिती संकलित करण्याचे काम त्यांनी हाती घेतले आणि किनारपट्टी भागातील तब्बल 200 घरटय़ांची माहिती त्यांच्याकडे जमा झाली. केवळ यावरच न थांबता पुनर्वसनाबाबतही संस्थेचा मोठा हातभार आहे. पाकोळी या पक्ष्याला वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षण मिळण्यासाठी भाऊंनी पुढाकार घेतला. वेंगुर्ला रॉक्स या बेटावर या पक्ष्याच्या घरटय़ांची तस्करी होत असल्याचे ग्रामस्थांनी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेच्या लक्षात आणून दिले. पाकोळी पक्ष्यांनी लाळेपासून बनविलेल्या घरटय़ाचे सूप पिण्याबाबत गैरसमज होते आणि यामुळेच बाहेरच्या देशात या घरटय़ांची तस्करी केली जात असे. ही तस्करी रोखण्याकरिता पोलिसांची मदत घेत व आंतरराष्ट्रीय पातळीवर याबाबतचा पाठपुरावा करत या पक्ष्यांना संरक्षण देण्यात भाऊंचा सहभाग मोलाचा आहे.

भाऊंच्या सह्याद्री निसर्गमित्र संस्थेची प्रत्येक मोहीम यशस्वी ठरली आणि त्यांचं कार्य सर्वदूरपर्यंत पोहोचलं. मात्र यात संस्था जास्त लोकाभिमुख झाली ती वेळास येथील ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धन आणि संरक्षण मोहिमेमुळे.
जानेवारी-फेब्रुवारीनंतर वेळास आंजर्ले या गावांच्या समुद्रकिनाऱयावर गेली काही वर्षे पर्यटकांची झुंबड उडते. घरटय़ातून बोहर पडणारी इवलीशी कासवांची पिल्लं कॅमेऱयात टिपण्यासाठी सगळेच आतुरलेले असतात, मात्र काही वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी होती. याबाबत शोधमोहीम राबवली असता या समुद्रकिनारी असलेली कासवांची अंडी तेथील स्थानिक फस्त करत असल्याचे भाऊंच्या निदर्शनास आले. वैशिष्टय़पूर्ण अशी प्रजाती असलेल्या ऑलिव्ह रिडले कासवांचे प्रजनन मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आल्याचे त्यांच्या लक्षात आले. येथूनच त्यांनी कासव बचावाची मोठी मोहीम उभी केली. आज मोहिमेला महोत्सवाचे वैश्विक रूप प्राप्त झाले आहे. समुद्री गरुड, गिधाड यांच्यासह पश्चिम घाटात आढळणाऱया जैकिक किकिधतेच्या रक्षणासाठी संस्थेनं भरीक काम केलं आहे. सध्या खवले मांजराच्या संरक्षणासाठी संस्थेचे महत्त्वपूर्ण काम सुरू आहे.

कोकणातल्या जैविक सृष्टीला जपण्याचे भाऊंचे ध्येय आहे. कोकणातील जैविक विविधतेविषयी असलेले ममत्व, सचोटी आणि संयमी कृत्ती हेच भाऊंच्या कामाचे गमक आहे. निसर्गाला जपायचे तर आधी स्थानिकांना सोबत घ्या हे सूत्र त्यांनी अवलंबिले आणि सह्याद्री निसर्ग मित्रचा डोलारा उभारा राहिला असं ते आवर्जून सांगतात. संरक्षण, संवर्धन, शिक्षण, लोकसहभाग याच माध्यमातून जैकिक किकिधता जोपासता येते हे त्यांच्या संस्थेने सिद्ध केले आहे. भाऊंच्या या कामाची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेण्यात आली आहे. कासक आणि अन्य जैविक विविधतेचे रक्षण करणे हे आपले काम आहे. ते आपण करायलाच हके नाही तर निसर्ग साखळी किस्कळीत होईल असं ते सांगतात. कन्यजीक संकर्धन आणि संरक्षण क्षेत्रात वेगळ्या वाटांचा मागोका घेणाऱया या अवलियाच्या कामाचा कित्ता नक्कीच गिरवला गेला पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या