नौदलाची कमाल – नेव्हल डॉकयार्ड मुंबईने बनवली अगदी स्वस्त ‘टेम्परेचर गन’

1706

नेव्हल डॉकयार्ड, मुंबईने यार्डच्या प्रवेशद्वारांवर मोठ्या संख्येने कर्मचार्‍यांची तपासणी करण्यासाठी गेटवरील सुरक्षा चौकीवरील भार कमी करण्यासाठी स्वत:चे हँडहेल्ड आयआर (इन्फ्रा रेड) आधारित तापमापक सेन्सर (थर्मामीटर) तयार केले आहे. हे उपकरण अवघ्या 1000 रुपयांत घरगुती साधनांचा वापर करून तयार केले गेले आहे. विशेष म्हणजे बाजारात तापमापक गनच्या किंमतीच्या तुलनेत हे अगदी स्वस्तात तयार झाले आहे.

कोविड -19 च्या सुरू असलेल्या साथीच्या रोगामुळे अलीकडच्या काळात जगातील सर्वात मोठी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. संक्रमित रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ लक्षात घेता देशातील वैद्यकीय पायाभूत सुविधांची अंतिम चाचणी घेतली जात आहे.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने इथे काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. वेस्टर्न नेव्हल कमांड (डब्ल्यूएनसी) च्या 25 वर्ष जुन्या नेव्हल डॉकयार्ड (एनडी) मध्ये दररोज सरासरी सुमारे 20,000 कर्मचारी ये-जा करत असतात. देशाच्या सुरक्षेसाठी जीवन देणाऱ्या जवानांची सुरक्षा तितकीच महत्त्वाची आहे.

आपली प्रतिक्रिया द्या