नवी मुंबई पालिका शाळेतील 14 मुलींचा विनयभंग, नराधम संगणक शिक्षक गजाआड

554

नवी मुंबई महापालिका शाळेतील 14 विद्यार्थिनींचा विनयभंग करणारा नराधम शिक्षक लोचन परुळेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व मुली सहावी ते आठवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱया आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालकवर्गात संतापाची लाट उसळली आहे.

परुळेकर हा मूळचा डोंबिवली येथील असून नवी मुंबई महापालिकेच्या एका शाळेत तो संगणक विषय शिकवत होता. त्याची नेमणूक वात्सल्य ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्याने संगणक शिकण्यासाठी येणाऱया मुलींबरोबर अश्लील वर्तन सुरू केले. शाळा सुटल्यानंतर परुळेकर काही मुलींना अतिरिक्त शिकवणीसाठी शाळेत थांबवायचा आणि त्यांच्याशी अश्लील चाळे करायचा.

नापास होण्याच्या भीतीने हा त्रास सर्व मुली सहन करीत होत्या. 12 फेब्रुवारी रोजी शाळेची सहल गेली असता परुळेकरने एका मुलीला शाळेत बोलवले. त्यावेळी त्याचा कारनामा एका शिपायाच्या निदर्शनास आला आणि हा प्रकार उघड झाला. शाळेच्या सर्व शिक्षकांनी मुलींना विश्वासात घेऊन विचारले असता त्या रडू लागल्या आणि त्यांनी गेल्या दोन महिन्यांपासून आपला कसा छळ केला जात आहे ते सांगितले. त्यानंतर वात्सल्य ट्रस्टच्या व्यवस्थापनाने या शिक्षकाला तातडीने निलंबित केले. याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करून परुळेकर याला अटक केली आहे.

शिरोळ तालुक्यात शिक्षकाने विद्यार्थीनीला आणून दिले विष 

सोमवारी शिरोळ तालुक्यातील एका दहावीतील विद्यार्थीनीचा अन्ननलिकेत संसर्ग झाल्याने मृत्यू झाला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. शाळेतील शिक्षकानेच तिला किटकनाशक दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.निलेश (रा. भैरेवाडी कुरुंदवाड) असे या शिक्षकाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या