संबित पात्रा हे बेडकासारखे, नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा बरळले

73

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका करताना कायम पातळी सोडणारे काँग्रेस नेते व पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. सिद्धू यांनी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना बेडूक म्हटले आहे. त्यामुळे आता सिद्धू व भाजप यांच्य़ातील वाद वाढतच जाणार असे दिसते.

नवज्योत सिंग सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे इंग्रज असे संबोधले होते. त्यानंतर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सिद्धूवर चढलेला ‘इटालियन’ रंग 23 मे नंतर उतरून जाईल असा टोला हाणला होता. संबित पात्रा यांनी टीका केल्यानंतर सिद्धू यांनी देखील त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.

‘संबित पात्रा हे पावसाळ्यात येणाऱ्या बेडकांसारखे डराव डराव करत राहता. हत्ती जेव्हा बाजारातून चालत असला तर हजार ठिकाणाहून आरडा ओरड होतो पण हत्ती चालतच राहतो, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर देखील निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेटी बचाव बेटी पढाओ या योजनेच्या 700 कोटींपैकी 400 कोटी स्वत:चे फोटो काढण्यात खर्च केले असा आरोप त्यांनी यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या