
‘तुंबाड’चा सिक्वेल ‘तुंबाड-2’ चित्रपट आणखी भीतीदायक दाखवण्यासाठी आता या चित्रपटात नवाजुद्दिन सिद्दिकीची एण्ट्री होणार आहे. नवाजुद्दिन हा चित्रपटात दिसणार आहे, यावर आता चित्रपट निर्माते सोहम शाह आणि पेन स्टुडियोज यांनी शिक्कामोर्तब केले आहे. तुंबाड सुपरहिट ठरल्यापासून या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहत्यांना उत्सुकता आहे. नवाजुद्दिनच्या एन्ट्रीमुळे आता या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढणार आहे. या चित्रपटात भूमिका मिळाल्याने नवाजुद्दिनने आनंद व्यक्त केला आहे. मी नेहमीच तुंबाडच्या मूळ कथेचा आणि चित्रपटाचा चाहता राहिलो आहे, असे त्याने म्हटले आहे.
























































