गडचिरोली बॉम्ब स्फोटाचा आरोप असलेला संशियत नक्षलवादी सत्यनारायण राणी यांची दोषमुक्तीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या बॉम्बस्फोटात एका नागरिकासह 15 पोलिसांचा बळी गेला होता.
73 वर्षीय राणी यांनी दोषमुक्तीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ऑगस्ट 2021मध्ये न्यायालयाने हा अर्ज अमान्य केला. त्याविरोधात राणी यांनी अपील याचिका दाखल केली. न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. विशेष न्यायालयाच्या निर्णयात काहीच दोष नाही, असे नमूद करत खंडपीठाने राणी यांना दोषमुक्ती देण्यास नकार दिला.