‘सरकार बनणार, पाच वर्ष चालणार’; शरद पवार यांचं मोठं विधान

2700
sharad-pawar

‘मध्यावधी निवडणुकांची अजिबात शक्यता नाही. हे सरकार बनणार, पाच वर्ष चालणार याची आम्ही सारे काळजी घेऊ’, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेटण्यासाठी शरद पवार हे नागपूर दौऱ्यावर आहेत.

नागपूर प्रेस क्लब येथे शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरं दिली. राज्यात अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सरकारने यामध्ये लक्ष्य घातलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं गांभीर्य आहे का ही शंका आहे असं म्हणतानाच या संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार कुणाकडे आहे हे आम्हाला माहीत आहे. कृषी आणि अर्थ मंत्रालयाशी बोलणं करेन, इथे जर मदत नाही मिळाली तर पंतप्रधानांकडे जाऊ, असंही ते म्हणाले.

विदर्भातील शेतकऱ्यांना देखील त्याचा मोठा फटका बसला आहे. फळबागांचे नुकसान आणखी मोठे आहे. हा प्रश्न आपण संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लावून धरू असं ते यावेळी म्हणाले. कर्जमाफीचा उल्लेख काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात आहे. त्यासाठी आपण पूर्ण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं.

केवळ ओला दुष्काळ करून काही होणार नाही, मदत जास्त गरजेची. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी आम्ही मागणी करणार आहोत, असंही ते म्हणाले.

भाजपचंच सरकार येईल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत, यासंदर्भात प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस यांना मी गेले काही वर्षांपासून ओळखतो आहे. मात्र ते ज्योतिष शास्त्राचे अभ्यासक नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तसंच त्यांचं ‘पुन्हा येणार, पुन्हा येणार’ एवढंच माझ्या डोक्यात आहे, आता तुम्ही हे नवीन सांगता आहात अशा शब्दात त्यांनी देवेंद्र फडणवीसांना चिमटा काढला.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

 • मी पुन्हा येणार एवढंच माझ्या डोक्यात आहे, आता तुम्ही नवीन सांगताहेत पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा
 • आम्ही धर्मांच्या विरोधात नाही. सेक्युलॅरीझमवर ठाम आहोत. एकसूत्री कार्यक्रमावर आमची चर्चा सुरू आहे
 • कर्जमाफीचा उल्लेख काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संयुक्त जाहीरनाम्यात आहे
 • केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या परिस्थितीचं गांभीर्य आहे का ही शंका आहे
 • सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी
 • केवळ ओला दुष्काळ करून काही होणार नाही, मदत जास्त गरजेची
 • कृषी आणि अर्थ मंत्रालयाशी बोलणं करेन, इथे जर मदत नाही मिळाली तर पंतप्रधानांकडे जाऊ
 • या संदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार कुणाकडे आहे हे आम्हाला माहीत आहे
 • सरकारने यामध्ये लक्ष्य घातलं पाहिजे अशी आमची मागणी आहे
 • तसेच पुढल्या पिकांसाठी आगाऊ काही रक्कम बिन व्याजाने किंवा कमी व्याजाने देण्यासंदर्भात बैठक बोलवू
 • शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्यात यावी अशी विनंती करणार
 • केंद्र सरकारकडे कृषीमंत्रालयाची एक बैठक बोलवून इथली माहिती देऊ
 • शेतकरी या नुकसानातून उभा राहणं कठीण आहे
 • झालेलं नुकसान लक्षात खूप मोठं आहे, बागांचं मोठं नुकसान झालं आहे
 • शासकीय नियमांनुसार 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालं आहे अशाच ठिकाणचे नुकसान गणले जाणार आहे
 • फळांसोबतच कापूस, सोयाबीन यांचं ही मोठं नुकसान झालं आहे
 • 60 ते 70 टक्के संत्री गळून पडली आहे
 • अतिवृष्टीमुळे पिकांवर रोग पसरले आहेत
 • तिथलं काम झाल्यानंतर मी लगेच विदर्भात पोहोचायचं निश्चित केलं होतं
 • मात्र राजकीय परिस्थिती योग्य नसल्यानं मला तातडीने येता आले नाही
 • नुकसान झाल्याचं कळाल्यानंतर लगेच इकडे यायचं होतं
 • विदर्भातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं
 • सत्तेत असताना पत्रकारांसाठी काही काम करण्याची संधी मिळाली होती
 • नागपूर प्रेस क्लबला शुभेच्छा
आपली प्रतिक्रिया द्या