एनसीबीच्या गुप्त चौकशीतील माहिती टीव्ही चॅनेलला कशी जाते!काँग्रेसने घेतला आक्षेप

बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्रींची एनसीबीने चौकशी सुरू केली आहे. या गुप्त चौकशीतील प्रत्येक मिनिटांचा तपशील प्रसारमाध्यमांमध्ये येत आहे. त्यामुळे एनसीबीने या महितीचे खंडन करावे, अन्यथा गुप्त चौकशीतील माहिती एनसीबीच टीव्ही चॅनेलकडे पोहोचवत असल्याचे सिद्ध होईल असा आक्षेप काँग्रेसने घेतला आहे.


बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी एनसीबीने अभिनेत्री व चित्रपटसृष्टीतील काहींना समन्स पाठवले आहेत. त्यातील काही जणांना अटकही झाली आहे. या चौकशीसाठी अभिनेत्री एनसीबीच्या कार्यालयात पोहोचल्या, पण एनसीबीच्या ऑफीसमध्ये काय सुरू हे याबद्दल प्रत्येक मिनिटांची माहिती प्रसारमाध्यमांमध्ये सुरू आहे. ही माहिती एनसीबीकडून हेतूपूर्वक फोडली जात आहे असे समजले जाईल. हे जर खरे ठरले तर फार दुर्दैव असेल. म्हणूनच एनसीबीने या सर्वांचे खंडन करावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरद्वारे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या