राममंदिराच्या पायाभरणीला पार्थ पवार यांच्या शुभेच्छा

801

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांनी जय श्रीराम असे नमूद करीत अयोध्येत राम मंदिराच्या भूमीपूजनाला शुभेच्छा देणारे पत्र ट्विट केली आहे. त्यावर पार्थ पवार यांची ही वैयक्तिक भूमिका असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

अयोध्येत श्री रामजन्मभूमीचे भूमीपूजन होत आहे. श्रध्दा व सांस्कृतिक अस्मितेचे प्रतिक असलेले श्री राम शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट व प्रदीर्घ होता असे नमूद करीत आपण हिंदू धर्माच्या पुर्नस्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत राम जन्मभूमी प्रकरणातून आखणी एक मोठा धडा शिकला पाहिजे सांगत त्यांनी अतिशय सविस्तरपणे पत्र लिहिले आहे. मात्र मी हे पत्र पहिल्यांदा बघत आहे. आम्हाला ते पत्र लिहिले नाही पण लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार असतो. सगळ्यांना दडपशाहीची इतकी सवय झाली आहे की व्यक्तिस्कातंत्र्याचा विसर पडला आहे का असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवार यांच्या या पत्रावर स्पष्टीकरण देताना केला.

आपली प्रतिक्रिया द्या