
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची तब्येत आता ठणठणीत असून त्यांनी हलका आहार घेण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत. पुढील 48 तासांत त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रॅंट यांनी दिली. डिहायड्रेशन झाल्याने व नियमित तपासण्यांसाठी पवार यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

































































