महाराष्ट्राच्या आर्थिक संकटावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी टीका केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले जाणारे निर्णय, जीआर आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही? अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.
केवळ निवडणुका समोर ठेवून मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय, GR, आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही अशी चर्चा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू असून या महिन्याच्या पगाराची तर आशासुद्धा सर्वांनी सोडलीय. सहकारी पक्षांची आर्थिक बेशिस्त आणि हवेतल्या घोषणांना…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 11, 2024
केवळ निवडणुका समोर ठेवून मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय GR आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही? अशी चर्चा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. या महिन्याच्या पगाराची तर आशासुद्धा सर्वांनी सोडलीय. सहकारी पक्षांची आर्थिक बेशिस्त आणि हवेतल्या घोषणांना कंटाळून गुरुवारच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अर्थमंत्री तर पहिल्या दहाच मिनिटांत उठून निघून गेले. त्यामुळे डबघाईला आलेला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची होत असलेली वाताहात बघून दिल्लीतील गुजरातचे नेते मात्र नक्कीच मनोमन खूष झाले असतील, असा जबरदस्त टोलाही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे.