पुण्यातील गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा? जयंत पाटील यांचा सवाल

पुण्यात एका माजी नगरसेवकाची गोळी घालून हत्या करण्यात आली आहे. यावरून पुण्यातील गुन्हेगारीला सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का असा जळजळीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विचारला आहे. तसेच विद्येचे माहेरघर असलेले पुणे बदनाम होऊ लागले आहे असेही पाटील म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून जयंत पाटील म्हणाले की, पुणे शहरात भर चौकात एका व्यक्तीची गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पुण्यातील टोळी युध्दाने परिसीमा गाठली आहे. पुण्यातील अंमली पदार्थांचे साठे सापडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे असे पाटील म्हणाले.

तसेच विद्येचे माहेरघर असणारे पुणे सत्ताधारी आणि यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे देशभर बदनाम होऊ लागले आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला राज्यातील सत्ताधाऱ्यांचा छुपा पाठिंबा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.