
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अरे मागितले असते तर सर्व काही दिले असते, पक्ष चोरण्याची काय गरज होती, असा संताप एका कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. निमित्त होते ते इंडिया टुडे कॉन्क्लेवचे. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू आहे. अशातच इंडिया टुडे कॉन्क्लेवच्यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाऊ अजित पवार यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, एनसीपी कायम अजित पवार यांना पक्षात ठेवू इच्छित होती. मात्र, अजित पवार यांनी आमचे जीवन उद्ध्वस्त करून सोडले. मी कधीही एनसीपीच्या नेतृत्वाची मागणी केली नव्हती. मात्र अजित पवार हे सगळं मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते, असेही सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या.