देशात दररोज होतात 87 बलात्कार, महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 7.3 टक्क्यांनी वाढ – एनसीआरबी

प्रातिनिधिक फोटो

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. अशातच देशातील गुन्ह्यांबाबत जाहीर झालेली आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालानुसार, वर्ष 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

वर्ष 2019 मध्ये हिंदुस्थानात दररोज 87 बलात्काराच्या घटना घडल्या असून महिलांवरील गुन्ह्यांमध्ये चार लाख पाच हजार 861 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ही एनसीआरबीने जाहीर केली आहे. आकडेवारीनुसार2018 च्या तुलनेत 2019 मध्ये महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सात टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 29 सप्टेंबर रोजी एनसीआरबीने जाहीर केलेल्या ‘क्राईम इन इंडिया – 2019’ या अहवालात असे म्हटले आहे की, मागील वर्षाच्या तुलनेत देशात महिलांवरील गुन्हेगारीत 7.3 टक्के वाढ झाली आहे. वर्ष 2019 मध्ये दर एक लाख लोकसंख्येवर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण 62.4 टक्के होते. 2018 मध्ये हा दर 58.8 टक्के इतका होता.

मुलांवरील गुन्हेगारीतही वाढ

एनसीआरबीच्या आकडेवाडीनुसार, महिलांसह लहान मुलांवरील गुन्हेगारीतही वाढ झालेली आहे. वर्ष 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये लहान मुलांवरील गुन्ह्यांच्या घटनांमध्ये 4.5 टक्के वाढ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या