महाराज म्हणाले ‘ही जिव्हा श्री दत्तचरणी समर्पित केली आहे’

>> निळकंठ कुलकर्णी ([email protected])

।। श्री स्वामी समर्थ ।।

नरसीच्या चातुर्मासानंतर (इ.स 1905) महाराज चौथ्यांदा ब्रह्मवर्तास गेले तेव्हां देवांनी तेथे एक परमहंस आले असल्याचे सांगितले. आज्ञा असेल दर्शनास जाता येईल, या महाराजांच्या सुचनेवर देव म्हणाले, तेच इकडे येतील. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी पाठच्या वेळीच ते आले महाराजांनी त्यांचा मान करून आसनावर बसविले. थोडा वेळ नुसते बसून काहीही संभाषण इ.न करता ते आले तसे निघून गेले. दिगंबर अवस्थेत सर्व द्वंद्वे (शितोष्णोदि) सहन करीत ध्यान मग्न गंगेच्या वाळवंटात पडून रहावे अशी याची स्थिती होता’ असे परमहंस दुसरे कोणी पहाण्यात आले नाहीत, असे महाराज त्यांच्या विषयी म्हणत.

1905 साली वाडीतून पंढरपूरला जाताना महाराजांचा मुक्काम कमळापूर येथे झाला. त्या दिवशी रात्री त्यांच्या स्वप्नांत एक आजानुबाहु पुरुष येऊन म्हणाला ‘तुम्ही सर्वत्र फिरता कविताही करता, मग आमच्याकडे तुमचे लक्ष का नाही? सकाळी महाराजांनी या संबंधी देवांना विचारता ते बोलले की, हे अक्कलकोटचे स्वामी असून यांची इच्छा तुम्ही अक्कलकोटला यावे व आपले चरित्र काव्यरूपाने लिहावे अशी दिसते. यावर महाराज म्हणाले’ ही जिव्हा श्री दत्तचरणी समर्पित केली आहे. श्रींची आज्ञा होऊन माहिती मिळाल्यास कवित्व करता येईल पण तशी काही आज्ञा झाली नाही. फक्त अक्कलकोटला जाऊन त्यांचे दर्शन घेण्याची अनुमती मिळाली. त्या प्रमाणे महाराजांनी अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेतले.

श्रीगुरुस्तोत्र

भावें नमूं श्रीगुरुच्या पदासी । जे आपदासी हरि दे पदांसी ।
दासीपरी श्री नमि ज्या पदांसी । यासी भजे तो नमितों पदांसी ।।१।।
सततविनतगम्य श्रेष्ठ दृष्ट। अगम्य । सदयह्यदयलभ्य प्रार्थीती ज्यासी सभ्य ।
समद विमद होती यत्प्रसादे न हो ती । कुगति सुगति देती त्या पदा हे विनंती ।।२।।
गुरुपदा विपदापहरा सदा । अभयदा भयदामयदारदा ।
हृतवदान्यमदा तव दास्य दे । अमददा न कुदास्य दे ।।३।।
नमस्ते भवारे नमस्ते शतारे । नमस्तेsरिवैर प्रशस्तेष्टसत्रे ।।४।।
गुरुपद मद वारी सर्व भेदां निवारी । गुरुपद गद वारी सर्व खेदां निवारी ।
सतत निवत होतां वारि जें आपदांसी । सतत विनत होऊं आम्ही ही त्या पदांसी ।।५।।
भावे पठति जे लोक हे गुरूस्तोत्रपंचक । तया होय ज्ञान बरें वासुदेव म्हणे त्वरें ।।६।।
।।इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वतीविरचिंत श्री गुरूस्तोत्रं संपूर्णम् ।।

।। श्रीगुरूचरणार्पणमस्तु ।।

आपली प्रतिक्रिया द्या