विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडू नका, मी भोगलंय! अभिनेत्रीने सांगितला क्रिकेटपटूसोबतचा किस्सा

75992

बॉलिवूड आणि क्रिकेटपटूंचे संबंध काही नवे नाहीत. आजही अनेक अभिनेत्रींनी क्रिकेटपटूंसोबत संसार थाटल्याचे आपल्याला दिसते. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीपासून ते माजी खेळाडू झहीर खानपर्यंत अनेकांनी अभिनेत्रींसोबत विवाह केला आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटच्या संबंधाबाबत आपण का बोलतोय याला एक कारण आहे.

बॉलिवूड अभिनेत्री निना गुप्ता यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी तरुणींना विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडू नका असा सल्ला दिला आहे. आता तुम्ही म्हणाल याचा क्रिकेटपटूशी काय संबंध. परंतु बॉलिवूडमध्ये आपल्या अदांनी घायळ करणाऱ्या या अभिनेत्रीला एका विवाहित क्रिकेटपटू क्लिन बोल्ड केले होते.

निना गुप्ता ‘बधाई हो’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटांमुळे पुन्हा एकदा अभिनयाच्या ट्रॅकवर आल्या. त्यांच्या अभिनयावर चित्रपट समिक्षकांसह चाहत्यांनी आणि प्रेक्षकांनीही कौतुकाची मोहोर उमटवली. रिल लाईफमध्ये त्यांनी केलेल्या भूमिकाही तितक्याच बोल्ड आणि बिनधास्त आहेत जेवढ्या त्या रियल लाईफमध्येही आहेत. निना गुप्ता यांचे वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटपटू व्हीव्हीएन रिचर्डस यांच्यासोबत संबंध होते. त्यांना मसाबा नावाची एक मुलगी असून निना या सिंगल मदर आहेत. त्यांनी ही गोष्ट कधीही लपवून ठेवली नाही. मात्र विवाहित पुरुषाच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर काय भोगावे लागले याबाबत त्यांनी नव्या व्हिडीओद्वारे सांगितले आहे.

neena-gupta-viv

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये निना गुप्ता यांनी आपला खासगी अनुभव सांगितला आहे. उत्तराखंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत असताना निना यांनी तरुणी आणि महिलांना सल्ला देणाऱ्या व्हिडीओमध्ये विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडू नका असे सांगितले आहे. विवाहित पुरुषांसोबत संबंध ठेवल्यानंतर काय भोगावे लागते आणि त्या संबंधांचा अंत कसा होतो, हे मला माहिती आहे, असेही त्यांनी व्हिडीओत सांगितले. ऐका, काय म्हणाल्या निना गुप्ता –


View this post on Instagram

#sachkahoontoe

A post shared by Neena ‘Zyada’ Gupta (@neena_gupta) on

एकेकाळी सोशल मीडियावर कामाची मागणी करणाऱ्या निना गुप्ता यांनी ‘बधाई हो’ या चित्रपटामध्ये एका वयस्कर महिलेची भूमिका केली होती. तसेच ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’मध्ये त्यांनी आयुष्मान खुराना आणि जितेंद्र कुमार यांच्यासोबत मोठा पडदा शेअर केला.

neena-gupta

आपली प्रतिक्रिया द्या