प्रियकर मला मारहाण करायचा, नीना गुप्ता यांचा धक्कादायक खुलासा

5279

अभिनेत्री नीना गुप्ता या सध्या यशाच्या शिखरावर आहेत. एका पाठोपाठ एक त्यांचे चित्रपट हिट होत आहेत. त्यांचे सौंदर्य व अभिनय या दोन्हींपुढे भल्या भल्या अभिनेत्री देखील गार पडतील असं आहे. त्यामुळे सध्या त्या बॉलिवूडमधल्या सध्या ‘यम्मी मम्मी’ ठरत आहेत.

मात्र या सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्री खासगी आयुष्य मात्र कायम चढ उताराचं राहिलं आहे. नीना गुप्ता यांचे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत अफेयर होते. या अफेयरमधून त्यांना एक मुलगी देखील झाली. मात्र नीना गुप्ता यांनी तिचा एकटीने संभाळ केला. नुकतंच नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीत त्यांच्या नातेसंबंधांविषयी बोलताना काही धक्कादायक खुलासे केले आहेत.

‘मी एक कणखर महिला आहे. मात्र माझ्यावरही बरेच अत्याचार झाले आहेत. माझ्या एका बॉयफ्रेंडने माझा खूप छळ केला होता. मला शिवीगाळ करत मारहाण केली होती. एका बॉयफ्रेंडने माझी फसवणूकही केली होती. मी त्याच्या प्रेमात पडलं होते. तो देखील माझ्यावर प्रेम करायचा. पण त्याचं लग्न ठरलं होतं. जर त्याने मला सांगितलं जर त्याच्या होणाऱ्या बायकोच्या कुटुंबीयांनी नकार दिला तर तो माझ्याशी लग्न करेल पण तसं झालं नाही. या जगात असलेल्या बऱ्याचशा महिलांसारखे माझेही प्रॉब्लेम आहेत. पण यात एकच फरक आहे की मी त्या प्रॉब्लेममध्ये अडकून राहिले नाही. स्वत:ला त्यातून बाहेर काढलं’, असं नीना गुप्ता यांनी सांगितलं.

नीना गुप्ता यांचा शुभ मंगल ज्यादा सावधान हा चित्रपट येत्या 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्यांच्यासोबत आयुषमान खुराणा, जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट गे संबंधांवर आधारित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या