युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा हिंदुस्थानचा ध्वजवाहक

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

अॅथलेटिक्समधील देशाचे भवितव्य असणारा युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा १८ ऑगस्टपासून जकार्ता येथे सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळय़ात हिंदुस्थानचा ध्वजवाहक असणार आहे.

हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए ) अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांनी हिंदुस्थानी संघाला शुभेच्छा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात ही घोषणा केली. आशियाई क्रीडा स्पर्धा १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत इंडोनेशिया येथील जकार्ता आणि पालेमबांग या ठिकाणी होणार आहे.

२० वर्षीय नीरज चोप्राने नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आणि गेल्या महिन्यात फिनलंड येथे झालेल्या स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकाकर आपले नाव कोरले होते. नीरज चोप्राने २०१७ मध्ये झालेल्या आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप आणि २०१६ मध्ये झालेल्या आयएएएफ वर्ल्ड अंडर-२० चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक पटकाकले होते.

हिंदुस्थानाने दक्षिण कोरियात झालेल्या २०१४ च्या आशियाई स्पर्धेत ११ सुवर्ण, ९ रौप्य, आणि ३७ कास्य अशी एकूण ५७ पदकांची कमाई केली होती. या स्पर्धेत हॉकीपटू सरदार सिंग हिंदुस्थानचा ध्वजवाहक होता.

खेळाडूंच्या यादीबाबत अजूनही साशंकता

आशियाई क्रीडा स्पर्धा तोंडाकर आली असून अजूनही क्रीडा मंत्रालयाकडून हिंदुस्थानच्या पथकाची घोषणा झालेली नाही. हिंदुस्थानच्या पथकातील खेळाडूंच्या संख्येबाबत क्रीडा मंत्रालयात किचारकिनिमय सुरू असून खेळाडूंच्या पथक संख्येबाबत साशंकता कायम आहे. ‘आयओए’ने भरपूर बदल आणि छाटणी करून ५७५ खेळाडू आणि २१३ अधिकाऱयांची यादी सोमकारी क्रीडा मंत्रालयाकडे सोपकली असून अंतिम यादीबाबत निर्णय प्रक्रिया सुरू आहे.