नेपाळच्या पंतप्रधानांना पुन्हा झटका; भव्य राममंदिर उभारण्याचे फर्मान

1659

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना पुन्हा झटका आला असून त्यांनी प्रभू रामचंद्र नेपाळचेच असल्याचा शड्डू ठोकला आहे. एवढेच नाही तर नेपाळमधील अयोध्यापूरी येथे भव्य राममंदिर उभारण्याचे फर्मानही त्यांनी सोडले असून त्यासाठी सरकार मदत करणार असल्याचे ऐलानही केले आहे.

नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानविरोधी भूमिका घेतली आहे. ओली हे चीनच्या इशाऱयावर नाचत असून त्यांनी गेल्याच महिन्यात प्रभू रामचंद्र हे मुळचे नेपाळचेच असून त्यांचे जन्मस्थान अयोध्यापूरी असल्याचा दावा केला. हिंदुस्थानने नेपाळवर सांस्कृतिक अतिक्रमण केल्याचाही त्यांनी आरोप केला होता. यावरून ते आपल्याच देशात प्रचंड टीकेचे धनी झाले. खुद्द त्यांच्याच पक्षाने ओलींकर टीकेची झोड उठवली.

पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी आज ठोरीजकळील माडी नगरपालिकेचे नाव बदलून अयोध्यापूरी ठेवण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर परिसरातील जागा अधिग्रहित करून त्याठिकाणी भव्य राममंदिर बांधण्याचे फर्मानही त्यांनी सोडले. विजयादशमीच्या मुहुर्तावर राममंदिर निर्माणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या