बलात्काराच्या आरोपानंतर नेपाळचा क्रिकेट कर्णधार संदीप फरार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेपाळचा स्टार क्रिकेटपटू आणि राष्ट्रीय संघाचा कर्णधार संदीप लामिछान याच्यावर आरोप ठेवण्यात आला असून संबंधित खेळाडूविरुद्ध अटक वॉरंटदेखील जारी करण्यात आला आहे. मात्र संदीप देशात परतलेला नाही. तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आणि त्याचे लोकेशनदेखील अद्याप समजलेले नाही. दरम्यान, संदीपने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्वतःला निर्दोष असल्याचे म्हटले आहे. नेपाळ पोलिसांनी याप्रकरणी संदीपला अटक करण्यासाठी  इंटरपोलची मदत घेतली आहे. इंटरपोलने संदीपच्या विरोधात डिफ्यूजन नोटीस बजावली आहे.