शेर्पा गाईडची उत्तुंग कामगिरी, तब्बल 25 वेळा माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत

कामी रिता… वय वर्षे 51… शेर्पा गाईड म्हणून ते काम करतात. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले. ती त्यांची 25वी खेप होती. अशी कामगिरी करणारे कामी रिता हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत. नेपाळच्या पर्यटन मंत्रालयाने याची अधिकृत घोषणा केली आहे.

कामी रिता यांच्यासोबत अन्य 11 शेर्पा गाईड एव्हरेस्टच्या शिखरावर गेले आहेत. दरवर्षी सर्क शेर्पा गाईड माऊंट एव्हरेस्टवर सर्वात आधी पोचतात आणि वाटेवर दोरखंड लावतात. या दोरखंड-रश्शींच्या मदतीने गिर्यारोहक एव्हरेस्ट चढतात. आता लवकरच गिर्यारोहणाचा हंगाम सुरू होणार आहे. त्यादृष्टीने कामी रिता यांची चढाई महत्त्काची समजली जात आहे.

कामी रिता यांनी 1994 साली पहिल्यांदा एव्हरेस्टवर कूच केली होती. त्यानंतर मागील 27 वर्षांमध्ये ते 25 वेळा एव्हरेस्टवर गेले. एव्हरेस्टवरील कोपऱयाकोपऱयाची त्यांना माहिती आहे. त्यामुळे कोणता मार्ग सुरक्षित आहे, कुठे धोका आहे, त्यांना चांगलंच ठाऊक असतं. म्हणूनच गिर्यारोहकांमध्ये कामी रिता यांना खूप मागणी असते. त्यांच्यासोबत जो एव्हरेस्टव्हर जाईल तो सुखरूप परत येईल, असं समजलं जातं. कामी रिता यांचे कडीलदेखील शेर्पा गाईड होते. एव्हरेस्टशिवाय के-टू, चो-ओयू, मनस्लू आणि होत्से यांची उंच शिखरेही त्यांनी पादाक्रांत केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या