पासवर्ड शेअरिंग होणार बंद!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि त्यात स्वस्तातील इंटरनेटची सुविधा असल्याने ओटीटीचा वापर हिंदुस्थानात बऱयापैकी वाढला आहे. त्यात हल्ली नेटफ्लिक्सवर प्रत्येकजण काहीना काही पाहत असतो. पण कधी स्वतःचा तर कधी दुसऱयाचा पासवर्ड वापरून नवे चित्रपट, वेबसीरिज पाहण्याचा मनमुराद आनंद घेत असतात. त्यामुळे मनोरंजनासाठी Netflix हे उत्तम साधन बनले आहे. मात्र हे आता सर्व बदलणार आहे. जर तुमचा नेटफ्लिक्सचा पासवर्ड तुम्ही कुणाला दिला असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता! सध्या सर्रास ओटीटीचा पासवर्ड शेअर केल्यामुळे एकाच लॉगइन आयडीवर किमान 4 ते 5 जण त्या प्लॅटफॉर्मचाचा आस्वाद घेत असतात. मात्र हे लवकरच बंद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.