Netflix, Prime Video आणि Disney+Hotstar चे सबस्क्रिप्शन ‘या’ प्लॅन्ससह मिळवा मोफत

कोरोना संकटामुळे चित्रपटगृहे बंद आहेत. यामुळे अनेक नवीन चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे, किंवा त्यांना ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केले जात आहे. यामुळे लोक ओटीटी प्लॅटफॉर्मला प्राधान्य देत आहेत. गेल्या काही वर्षांत ओटीटी प्लॅटफॉर्म चित्रपट आणि मनोरंजन वाहिन्यांचा पर्याय म्हणून समोर येत आहे. याचेच महत्व जाणून अनेक टेलिकॉम कंपन्या आपल्या रिचार्ज प्लॅनसोबत Netflix, Prime Video आणि Disney+Hotstar चे सबस्क्रिप्शन ऑफर करत आहेत.

अॅमेझॉन प्राइम

जिओ फायबरने अलीकडेच आपल्या प्रीपेड योजना अपडेट केल्या आहेत. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ सर्व्हिस जिओ फायबरच्या 999 रुपयांच्या गोल्ड प्लॅन अंतर्गत मोफत मिळत आहे. यासोबतच एअरटेलही आपल्या 349 आणि 499 रुपयांच्या पोस्ट पेड प्लॅन अंतर्गत मोफत प्राइम व्हिडीओ सर्व्हिस देत आहे.

नेटफ्लिक्स

जिओ फायबरच्या 1499 रुपयांच्या प्लॅन अंतर्गत 12 अॅप्ससह नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे. व्होडाफोनच्या रेडएक्स पोस्ट पेड प्लॅनसोबतही याचे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे. या प्लॅनची किंमत 1099 रुपये आहे.

डिस्ने प्लस हॉटस्टार

एअरटेल आपल्या 56 दिवसांच्या 599 आणि 401 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’चे व्हीआयपी सबस्क्रिप्शन मोफत देत आहे. यासोबतच एअरटेलच्या 2698 रुपयांच्या प्लॅनवरही याचे सबस्क्रिप्शन मोफत देण्यात येत आहे. जिओ फायबरच्या 1499 रुपयांच्या प्लॅनवरही याचे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या