युगानुयुगे तूच :
संदर्भ आणि अन्वयार्थ
संपादक : एकनाथ पाटील
प्रकाशक : लोकवाङ्मय गृह
पृष्ठे : 144 मूल्य : 200 रुपये
‘युगानुयुगे तूच’ ही अजय कांडर यांची दीर्घकविता. आंबेडकरांचे विचार, त्यांची मूल्यं यांची सार्वकालिकता या कवितेतून प्रकट होते. त्यांच्या विचारांतील नवसर्जनशीलता अधोरेखीत करणाऱया कवितेचे अन्वयार्थ उलगडत केलेल्या समीक्षणपर लेखांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक.
सातवा ऋतू
कवयित्री : रोहिणी निनावे
प्रकाशक : मेनका प्रकाशन
पृष्ठे : 200
मूल्य : 104 रुपये
गीतलेखन, मालिकालेखन, कविता अशा सर्व क्षेत्रांत लेखनाचा ठसा उमटवणाऱया रोहिणी निनावे यांचा हा कवितासंग्रह. साध्या, सोप्या शब्दांत उतरलेली ही शब्दकळा रसिकांना नक्कीच आवडणारी आहे. शब्दांच्या वेगळ्या ऋतूमध्ये नेणाऱया या कविता भावनांची गुंतागुंत आणि विभ्रम हळूवारपणे रसिकांपर्यंत पोहोचवतात.
दस्तऐवज
कवयित्री : अनघा तांबोळी
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन
पृष्ठे : 88
मूल्य : 160 रुपये
आपले मन अनुभवांती अनेक नोंदी करत जाते. या सुखदुःखाच्या नोंदी आपली सोबत करीत राहतात. त्यापरत्वे बदललेलं हे अनुभवांचं जग, या नोंदी कवयित्रीने तिच्या कवितांमधून आपल्यासमोर मांडल्या आहेत. या कविता म्हणजेच आपली सोबत करणाऱया आपण जमवलेल्या नोंदींचा दस्ताऐवज.