दिल्ली दंगलीमागे संघाचा हात; अॅड. प्रकाश आंबेडकरांचा आरोप

870

सीएए कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला दंगलीचे स्वरूप प्राप्त झाले. दिल्लीची दंगल पूर्वनियोजित होती. या दंगलीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप आहे, असा स्पष्ट आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पंढरपूर येथे राष्ट्रसंत सेना महाराजांच्या 830 व्या जयंतीनिमित्त आयोजित नाभिक समाजाच्या पहिल्या अधिवेशनात ते बोलत होते.

अशा दंगली पुन्हा झाल्या तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. राज्यातील मंत्र्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून काळजीचे कारण नसल्याची विधाने करायला सुरुवात केली आहे. हे प्रश्न केंद्राचे आहेत आणि यात राज्य काही करू शकत नाही, अशी वायफळ विधाने करण्यापूर्वी त्यांनी समजून घ्यायला हवे, परंतु सत्तेशिवाय जगू न शकणारी ही मंडळी प्रश्नांचे गांभीर्य घालवत आहेत. नागरिकत्व गेल्यावर एक दिवस लोकच या मंत्र्यांच्या पाठीमागे दगड घेऊन लागतील, असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या