स्त्री हक्काच्या नव्या पर्वाची सुरुवात, उद्यापासून तीन दिवसीय राज्यव्यापी परिषद

स्त्री मुक्ती चळवळीला 50 वर्षे पूर्ण झाल्याने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये 20, 21 आणि 22 डिसेंबर रोजी तीन दिवसीय राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत गेल्या 50 वर्षांतील स्त्राr चळवळीचा आढावा आणि पुढील 50 वर्षांच्या कामाची दिशाही ठरविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र स्त्राr मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे, उपाध्यक्ष चयनिका शहा, सचिव ऍड. निशा शिवुरकर आणि खजिनदार डॉ. छाया दातार यांनी परिषदेची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या सदस्या लता भिसे–सोनावणे, मनीषा गुप्ता, हसिना खान, सुनीता बागल आणि शुभदा देशमुख उपस्थित होत्या. या परिषदेत पहिल्या दिवशी घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा छळ, वैवाहिक व कौटुंबिक हिंसाचार, जातीय व सांप्रदायिक हिंसाचार तसेच संविधानासमोरील आव्हाने यासारख्या विषयांवर गटचर्चा व परिसंवाद आयोजित केला आहे. दुसऱया दिवशी आर्थिक व राजकीय स्थिती, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण व विकास, तसेच नवीन कामगार कायदे याविषयावर तज्ञांची मत मांडली जाणार आहेत. परिषदेच्या दरम्यान नाटक, माहितीपट आणि नृत्यनाटय़ असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जातील. शेवटच्या दिवशी आझाद मैदानात स्त्राr मुक्ती परिषदेची जाहीर सभा होणार आहे. या सभेत विविध समुदायांची निवेदने सादर केली जाणार आहेत.