व्हॉट्सअॅप स्टेटसने वैतागला आहात? मग या नवीन अपडेटबद्दल वाचायलाच हवे

193

सामना ऑनलाईन । मुंबई

व्हॉट्सअॅच्या स्टेटसवर फोटो व व्हीडिओ अपडेट करण्यासाठी तयार करण्यात आलेले नवीन फिचर कालावधीतच जबरदस्त हिट झाले होते. मात्र यात काही जण इतक्यावेळा स्टेटस अपडेट करत असतात की त्यांचे स्टेटस बघण्याचा कंटाळा येतो. अशा लोकांचे स्टेटस आता आपण हाईड (लपवू) करू शकणार आहोत.

व्हॉट्सअॅप लवकरच स्टेटस हाईड करण्याचे फिचर आणणार आहे. या नव्या फिचरमुळे आता ‘म्यूट स्टेटस अपडेट’ या सेक्शनजवळ ‘हाईड अपडेट’ असा पर्याय दिसणार आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला न आवडणाऱ्या व्यक्तीचे स्टेटस तुमच्यापुरता बंद करता येतील. सध्या व्हॉट्सअॅप या फिचरची चाचणी घेत असून लवकरच ते वापरात आणण्यात येणार आहे. या फिचरचे अपडेट सर्वप्रथम अॅण्ड्रॉईड फोनमध्ये उपलब्ध होईल.

आपली प्रतिक्रिया द्या