स्थानीय लोकाधिकार समिती आयोजित, न्यू इंडिया ऍश्युरन्स क्रिकेट स्पर्धा आजपासून परळमध्ये रंगणार

548

स्थानीय लोकाधिकार समिती, न्यू इंडिया ऍश्युरन्स गेली 33 वर्षे कै. देविदास खेडेकर स्मृतिप्रीत्यर्थ मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धा कर्मचार्‍यांकरिता आयोजित करीत आहे. या स्पर्धेचे खास वैशिष्टय़ म्हणजे, व्यवस्थापनाच्या अधिकार्‍यांसहित कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांचादेखील या क्रिकेट सामन्यात मोठय़ा प्रमाणात सहभाग असतो. तसेच शिवसेना पदाधिकारी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतात. या वर्षी 32 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

स्पर्धेतील क्रिकेट सामने 14 व 15 डिसेंबर असे दोन दिवस सकाळी 9 ते रात्री 10पर्यंत सेंट्रल रेल्वे मैदान, परळ येथे दिवसा व प्रकाशझोतात खेळविले जातील. ही स्पर्धा शिवसेना सचिव , स्थानीय लोकाधिकार समिती न्यू इंडियाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली खेळविली जाणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला अतुल सहाय, (अध्यक्ष व कार्यकारी संचालक न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी), किशोरीताई पेडणेकर,(महापौर मुंबई), शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सरचिटणीस दिनेश बोभाटे, खजिनदार अजय गोयजी, चिटणीस राजू पांजरी, राजू राणे, अजय पथरोड, आल्हाद नाईक, सचिन लोके, ललित अत्तावर हे पार पाडत आहेत.

केआरपी इलेव्हन संघाने डॉ. एच. डी. कांगा लीगमधील जी डिव्हिजनमध्ये उपविजेतेपद मिळवले. संजय हडापी यांच्या मार्गदर्शनाखाली संघाला चमकदार कामगिरी करता आली. या संघाचे आता एफ डिव्हिजनमध्ये प्रमोशन झाले आहे. या संघाचे सेक्रेटरी संदीप विचारे असून हरीश राणे, रायन रॉड्रिक्स यांचाही संघाच्या भरारीत मोलाचा वाटा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या