अमरापूरकर मायलेकींचा ‘पुरुषोत्तम’ प्रेक्षकांच्या भेटीला

29

सामना ऑनलाईन । मुंबई

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या पत्नी सुनंदा अमरापूरकर यांची प्रस्तुती असलेला ‘पुरूषोत्तम’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे अमरापूरकर यांची कनिष्ठ कन्या रीमा अमरापूरकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून, ज्येष्ठ कन्या केतकी अमरापूरकर या सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करीत आहे. समाजहिताच्या ध्येयाने झपाटलेल्या एका प्रामाणिक अधिकाऱ्याची गोष्ट सांगणाऱ्या या सिनेमाची निर्मिती संवेदना फिल्म फाऊंडेशन आणि आदर्श ग्रुप यांनी केली आहे.

‘पुरुषोत्तम’ या सिनेमाचे नुकतेच सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्टर लाँच करण्यात आले. या सिनेमात नंदु माधव यांची प्रमुख भूमिका असून, किशोर कदम, देविका दफ्तरदार, केतकी अमरापूरकर आणि पूजा पवार हे कलाकारदेखील झळकणार आहेत. सदाशिव अमरापूरकर यांच्या जन्मदिवसाच्या एक दिवस आधी म्हणजेच, येत्या 10 मे रोजी अमरापुरकर मायलेकींचा ‘पुरूषोत्तम’ हा सिनेमा संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या