जम्मू-कश्मीर पोलिसांचा दगडफेक्यांना पकडण्यासाठी सॉलिड उपाय, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,श्रीनगर

पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना पकडण्यासाठी जम्मू-कश्मीर पोलिसांनी एक सॉलिड उपाय शोधून काढला आहे. पोलिसांनी या मार्गाचा वापर करत अश्रूधुराचा किंवा, रबर बुलेटचा वपर न करता दगडफेक करणाऱ्यांना पकडण्यात यश मिळवलं आहे. शुक्रवारी जामा मशिद परिसरात दगडफेकीला सुरुवात झाली होती. ही दगडफेक करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी या नव्या मार्गाचा अवलंब करण्यात आला होता.

पोलिसांनी त्यांचे जवान साध्या कपड्यामध्ये दगडफेक करणाऱ्यांमध्ये पाठवायला सुरुवात केली आहे. काही काळ ते देखील दगडफेक करण्याचं नाटक करायचं आणि ही दगडफेक करणाऱ्यात आघाडीवर असणाऱ्यांना अलगदपणे पकडायचं असी रणनिती पोलिसांनी आखली आहे. शुक्रवारी हाच मार्ग अवलंबत पोलिसांनी जमावाला चिथावणी देणाऱ्या दोन जणांना पकडलं आणि खेळण्याच्या बंदुकांचा धाक दाखवत जमावापासून दूर घेऊन गेले. चिथावणी देणाऱ्यांनाच पकडल्यामुळे जमावाची हवा गुल झाली होती. काही मिनिटांमध्ये दगडफेक करणारी जनता रस्त्यावरून गायब झाली आणि त्यांना चिथावणी देणारे तुरुंगात पोहोचले