
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन युनियन (EU) आणि मेक्सिकोमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 30 टक्के आयात कर (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा ट्रम्प यांनी शुक्रवारी केली असून, यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.
ट्रम्प यांनी या निर्णयामागे अमेरिकेच्या आर्थिक हितांचे संरक्षण आणि स्थानिक उद्योगांना चालना देण्याचा उद्देश असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या मते, युरोपियन युनियन आणि मेक्सिकोमधून होणारी आयात अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवत आहे. हा कर लागू केल्यास अमेरिकन उत्पादकांना स्पर्धेत फायदा होईल, असा त्यांचा दावा आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळातही अनेक देशांवर आयात कर लादले होते, ज्यामुळे व्यापार युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, हिंदुस्थान आणि अमेरिकेमध्ये सध्या व्यापारी कराराबाबत चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या या नव्या धोरणामुळे हिंदुस्थाननेही आपल्या आयात-निर्यात धोरणांचा पुनर्विचार करावा लागू शकतो. विशेषतः स्टील, अॅल्युमिनियम आणि आयटी उत्पादनांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.