
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीनगरी सज्ज झालीय. पहाटेपासूनच साईभक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून आली आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातून देशभरातून लाखो सहभागी आज शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावे यासाठी रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय.

नवीन वर्षानिमित्त साई समाधी मंदि, चावडी, द्वारकामाई या ठिकाणी आकर्षक अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली आहे.

सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असून साई नामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेलीय.




























































