प्रभासच्या ‘राधेश्याम’ला नववर्षाचा मुहूर्त

अभिनेता प्रभासच्या रोमँटिक ‘राधेश्याम’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले आहे. अखेर नवे पोस्टर शेअर करत प्रभासने चित्रपटाच्या रिलीजची नवीन तारीख जाहीर केली आहे. पुढच्या वर्षी मकर संक्रांतीला म्हणजे 14 जानेवारी 2022 रोजी ‘राधेश्याम’ रिलीज होणार आहे. प्रभासने मंगळवारी सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यात तो एक डेपर लूकमध्ये युरोपातील रस्त्यांवर भटकताना दिसतोय. या पोस्टरवरच प्रदर्शनाची नवीन तारीख दिसत आहे. त्यामुळे नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात प्रभासच्या या चित्रपटाने होणार असल्याचे दिसत आहे. प्रभाससोबत यात पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. ‘राधेश्याम’ एक बहुभाषी चित्रपट असून गुलशन कुमार व टी-सिरीज यांच्याद्वारे प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा पृष्ण कुमार यांनी केले आहे. यूवी क्रिएशन्स बॅनरखाली चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या