
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची घाई झाली आहे, या मथळय़ाखाली ‘न्यूयॉर्क टाइम्स’मधून जोरदार टीका करण्यात आली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना विश्वासात न घेताच ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली, यावरून ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने ट्रम्प यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. द्विपक्षीय पद्धतीने तोडगा काढण्यासाठी हिंदुस्थान नेहमीच आग्रही असून दोन देशांच्या प्रश्नात तिसऱ्या देशाची मध्यस्थी न स्वीकारण्याच्या हिंदुस्थानच्या भूमिकेचे कौतुकही केले आहे.
ट्रम्प यांनी परस्पर युद्धविरामाची घोषणा केल्याप्रकरणी हिंदुस्थानने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात म्हटले असून हिंदुस्थानने पाकिस्तानच्या आण्विक तळावर क्षेपणास्त्रांचा मारा केल्यामुळे अमेरिकेने मध्यस्थी केल्याचेही नमूद केले आहे. ट्रम्प यांच्या मध्यस्थीवर हिंदुस्थान नाराज असून शांततेच्या नोबेलची घाई झाल्यानेच ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला. पाकिस्तानच्या मुद्दय़ावर अमेरिका आणि चीनची भूमिका एकच असल्याचेही ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.
पाकिस्तानबद्दल अमेरिका, चीनची भूमिका एकच
हिंदुस्थान हा राजनैतिकदृष्टय़ा अमेरिकेच्या जवळ आला असून अनेक शस्त्रास्त्रs अमेरिकेकडून खरेदी करतो. मात्र जेव्हा पाकिस्तानचा प्रश्न येतो तेव्हा चीन आणि अमेरिकेची भूमिका एकच असते, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या वृत्तात म्हटले आहे.
हिंदुस्थानने पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रागारावर हल्ला केल्याचे वृत्त नाकारले
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा असलेल्या किराना हिल्सवर हल्ला केल्याची चर्चा होती. हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील एअर बेसवर हल्ला केला होता. त्यावेळी पाकिस्तान घाबरला होता. कारण तिथून जवळच काही अंतरावर किराना हिल्स येथे पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा साठा आहे, असे सांगितले जात होते. त्यामुळेच पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी गुडघ्यावर आला, अशी चर्चा होती. मात्र हिंदुस्थानी हवाई दलाचे एअर मार्शल ए. के. भारती यांनी किराना हिल्सवर हल्ला केल्याचे वृत्त नाकारले होते