यंदाच्या आयपीएलनंतर न्यूझीलंड क्रिकेट संघ हिंदुस्थान दौऱ्यावर येणार

कोरोना महामारीची मिठी सैल होत असल्याने आता हिंदुस्थानातही आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिका आणि स्पर्धा खेळवण्याचा निर्णय हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतल्याचे वृत्त आहे. टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळत आहे. त्यानंतर इंग्लंड संघ हिंदुस्थान दौऱयावर येणार आहे. या स्थितीत आता यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेनंतर न्यूझीलंड संघही ऑक्टोबरदरम्यान हिंदुस्थान दौऱयावर येणार असल्याचे समजते.

यंदाची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा हिंदुस्थानात आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी झाल्यावर न्यूझीलंड क्रिकेट संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत टीम इंडियाविरुद्ध 2 कसोटी लढती आणि दोन
टी -20 लढतीची मालिका खेळावी लागेल.

यंदा आयपीएल हिंदुस्थानातच

यंदा आयपीएल क्रिकेट लीग हिंदुस्थानात खेळवण्यासाठी बीसीसीआय आग्रही आहे. शिवाय आयपीएलचे पुरस्कर्ते आणि प्रसारण हक्क मिळवणाऱया कंपन्यांनी ही स्पर्धा हिंदुस्थानातच व्हावी यासाठी बीसीसीआयवर दबाव आणला आहे. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये अधिकाधिक संघांना खेळवून अधिक महसूल मिळवण्यासाठी क्रिकेट बोर्ड इच्छुक आहे. त्यामुळे यंदा आयपीएल हिंदुस्थानातच होणार हे आता स्पष्ट झाले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या