आप्पाचा विषय लय हार्ड है… ‘बाबू’नंतर ‘आप्पा’चा इन्स्टावर धुमाकूळ!
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर सध्या ‘आप्पा’ या गावाकडच्या शब्दाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. इन्स्टावरील युजर्स लाइक, कमेंट आणि शेअर्स मिळवण्यासाठी वेगवेगळ्या रील्स बनवत असतात. यासाठी दररोज वेगवेगळे प्रयोगसुद्धा करत असतात. परंतु आता ‘आप्पा’ या नावाने बनवलेल्या एका रॅप गाण्यावर हजारो रील्स बनवल्या जात आहेत. काही महिन्यांपूर्वी ‘बाबू’ या शब्दाने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातला होता. या रील्सला सहा मिलियनहून अधिक वेळा पाहिले गेले होते. परंतु आता इन्स्टावरील ‘आप्पा’ रॅप साँगच्या बोलांनी धुमाकूळ घातला आहे. या रॅप साँगचे सुरुवातीचे बोल असे आहेत, ‘आप्पाचा विषय लय हार्ड है, आप्पाकडं व्रेडिटचं कार्ड है, आप्पाचं घरात नाही ध्यान, पण आप्पाचं बाहेर लय लाड है’ असे असून यावर इन्स्टा युजर्स हजारो रील्स बनवत आहेत. ‘आप्पा’च्या रील्सला लाखो युजर्सची पसंती मिळत असून लाइक, कमेंट आणि शेअर्सचा अक्षरशः पाऊस पडत आहे.
30 दिवसांत 1.31 कोटी लोकांचा विमान प्रवास
देशात विमानाने प्रवास करणाऱया प्रवाशांची संख्या जुलै महिन्यात 1.31 कोटी झाली आहे. मागील वर्षी जुलैच्या तुलनेत ही संख्या 8.6 टक्के अधिक आहे. या वर्षी जून महिन्यात 1.32 कोटी लोकांनी देशांतर्गत विमान प्रवास केला होता. त्यामुळे जूनच्या तुलनेत जुलैमध्ये 0.5 टक्के संख्या घसरली आहे. एप्रिल ते जूनच्या पहिल्या तिमाहीत 80.5 लाख हिंदुस्थानींनी आंतरराष्ट्रीय विमान प्रवास केला. जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 16.7 टक्के अधिक आहे. जुलैमध्ये प्रत्येक उड्डाणावेळी प्रवाशांची संख्या 143 होती. जी जुलै 2023 मध्ये 139 होती, तर जून 2024 मध्ये 144 होती. देशातील अनेक शहरात विमानतळे असल्याने तसेच विमानभाडे रेल्वेच्या तुलनेत जास्त नसल्याने श्रीमंतांमधील अनेकजण दैनंदिन कामासाठी विमान प्रवास करत आहेत. त्यामुळे विमान प्रवासात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
गुगलचा फोन, स्मार्टवॉच आज लाँच होणार
गुगलचा पिक्सल 9 किनोट इव्हेंट उद्या मंगळवारी रात्री 10.30 वाजता सुरू होणार आहे. हा इव्हेंट पंपनीचे मुख्यालय पॅलिफॉर्नियातील माउंंटेन व्यू येथे पार पडणार आहे. या इव्हेंटमध्ये पंपनी पिक्सेल 9 सीरिज अंतर्गत चार स्मार्टपह्न लाँच करणार आहे. यात पिक्सल 9, पिक्सल 9 प्रो, पिक्सल प्रो एक्सएल आणि पिक्सल 9 प्रो पह्ल्ड या चार पह्नचा समावेश आहे. यासोबतच पंपनी नवीन पिक्सल बडस् प्रो 2 आणि नवीन पिक्सल स्मार्टवॉच 3 सुद्धा लाँच करणार आहे. गुगलचा इव्हेंट दरवर्षी ऑक्टोबरमध्ये होतो. परंतु पहिल्यांदाच पंपनी ऑगस्टमध्ये इव्हेंट करत आहे.
हिमाचल प्रदेशात पुरात इनोव्हा वाहून गेली, नऊ जणांचा मृत्यू
हिमाचल प्रदेशात पावसाचा कहर सुरू आहे. लग्नासाठी जाणाऱया एका कुटुंबावर काळाने घाला घातला. पुरात इनोव्हा गाडी वाहून गेल्याने गाडीतील सर्वच्या सर्व नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमधील नवांपूर शहर येथे लग्नासाठी जात असताना होशियारपूर जिह्यातील माहिलपूर ब्लॉकमधील जेजॉन शहराजवळ ही दुर्दैवी घटना घडली. कारमधील नऊ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. मुसळधार पाऊस सुरू असल्याने नाल्याला पूर आला होता. हे लोक हिमाचलहून पंजाबच्या नवांपूर शहराकडे लग्नासाठी जात होते. या इनोव्हामध्ये एकूण 11 जण प्रवास करत होते.
युक्रेनचे सैन्य रशियाच्या हद्दीत 30 किमीपर्यंत घुसले, झेंडाही फडकवला
बलाढय़ रशियाला छोटेसे समजले जाणारे युक्रेन जबरदस्त टक्कर देत आहे. युक्रेनच्या सैन्यांनी रशियाच्या हद्दीत 30 किलोमीटर घुसून त्या ठिकाणी आपल्या देशाचा झेंडा फडकवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे युद्ध सुरू असून युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच युव्रेनच्या सैन्यांनी रशियाच्या आत घुसून हल्ला केला आहे. हे सैन्य जवळपास 250 चौरस किलोमीटरपर्यंत घुसले आहे. युक्रेनियन सैन्याचे पुढील लक्ष्य सुदजा हे रशियन शहर आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात युक्रेनचे सैनिक इमारतींवरील रशियाचा ध्वज काढून त्याजागी त्यांच्या देशाचा ध्वज लावत आहेत. युक्रेनचा हल्ला रोखण्यासाठी रशिया शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.
हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार
ज्या भागात ही लढाई सुरू आहे तो भाग कुर्स्क न्यूक्लिअर प्लांटजवळ आहे. हा पॉवर प्लांट रशियामधील सर्वात मोठय़ा अणू प्रकल्पांपैकी एक आहे. युव्रेनियन दहशतवादी हल्ल्याचा निषेध करते. त्याचा उद्देश रशियन नागरिकांना मारणे, त्यांना घाबरवणे आणि पायाभूत सुविधा नष्ट करणे हा आहे. रशियन लष्कराकडून युव्रेनच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा यांनी म्हटले.
ऑस्ट्रेलियात हेलिकॉप्टर कोसळले
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील एका हॉटेलच्या छतावर हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेत पायलटचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाल्याने हॉटेलमध्ये ग्राहक प्रचंड घाबरले होते.
हॉटेलमधील जवळपास 400 लोकांना कर्मचाऱयांनी सुरक्षित बाहेर काढले. हेलिकॉप्टरने नेमके कशासाठी उड्डाण केले होते, ही दुर्घटना कशामुळे घडली, याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
व्हॉट्सअॅपवर लवकरच ऑनिमेटेड अवतार
व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी एक नवीन अपडेट आणणार आहे. या फिचर अंतर्गत युजर्स त्यांच्या प्रोफाईलवर स्वतःचा
ऑनिमेटेड अवतार सेट करू शकतील. युजर्सना हे अवतार चॅटमध्ये स्टिकर्स म्हणून तसेच मेटाच्या इतर सेवांसाठी वापरता येतील. अवतार क्रिएट करण्यासाठी सेटिंगमध्ये कस्टमायझेशन पर्याय उपलब्ध आहे.