जय भीम नगरवरील कारवाई महापालिका, पोलिसांना भोवणार
जय भीम नगरमधील झोपडय़ांवरील कारवाई महापालिका, पोलिसांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. या कारवाईचा तपास सीआयडीकडे सोपवावा की यासाठी विशेष पथकाची स्थापना करावी, या मुद्दय़ावर आज शुक्रवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
शिष्यवृत्ती योजना
मूलभूत विज्ञानात उच्च शिक्षणाकरिता गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर सहाय्य मिळावे याकरिता मराठी विज्ञान परिषदेने शिष्यवृत्ती योजना सुरू केली. या शिष्यवृत्तीकरिता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या प्रत्येक विषयातील आठ म्हणजे एकूण 32 विद्यार्थ्यांची निवड या वर्षी केली जाणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षात एमएस्सी/एमए (गणित) या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाकरिता प्रवेश घेतलेले महाराष्ट्रातील विद्यार्थी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज (https://forms.gle/38QdFgHa12EtEX889) करू शकतात. अधिक माहितीकरिता संपर्क ः 9969100961 (11 ते 5) संकेतस्थळ – https://mavipa.org
गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
सिंधुदुर्ग जिह्याचे रहिवासी असलेल्या मराठा ज्ञातीतील, ज्या पालकांची मुले/मुली बी.एस.सी. (आय.टी.), सी.ए. तसेच मेडिकल, इंजिनीयरिंग, अॅग्रीकल्चर, फार्मसी कॉलेज व नर्सिंगमध्ये शिक्षण घेत आहेत, अशा गरजू व हुशार मुलांना परतफेडीच्या अटीवर शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी छापील फॉर्म सावंतवाडी संस्थान मराठा समाज, मुंबई, स्टार मॉल, तिसरा माळा, दादर या पत्त्यावर (सोमवार सोडून) दुपारी 1 ते सायंकाळी 6 या वेळेत घेऊन 30 ऑगस्टपूर्वी संस्थेच्या कार्यालयात जमा करावेत. अधिक माहितीसाठी संपर्क ः 9833946961, 9137469348.