आणखी तीन वर्षे मंदी कमी होणार नाही, यशवंत सिन्हा यांचे भाकित

देशात आर्थिक मंदी आल्यानंतर अर्थमंत्री, आरबीआय अनेक उपाययोजना करत आहेत, पण त्यावर कितीही उपाययोजना केल्या तरी मंदी आणखी तीन वर्षे कमी होणार नाही असे भाकीत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्त  केले. कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंदीवर बोलताना सिन्हा म्हणाले, ‘वास्तविक रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार आर्थिक प्रगतीचा वेग 2 टक्क्यांनी घसरला आहे. रघुराम राजन, अरविंद सुब्रमण्यम, नोबेल पुरस्कार विजेत्या अभिजित बॅनर्जी यांनीही आर्थिक मंदीबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. मंदीची जाणीव झाल्यामुळे सरकारने पावले उचलली पण त्याचा फायदा बड्या उद्योजकांना झाला. अर्थव्यवस्था सुधारण्यास त्याची मदत होणार नाही, असेही ते म्हणाले.

काँग्रेसची दखल आता मीडियाही घेत नाही!

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांनंतर देशपातळीवर काँग्रेस नेत्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यांच्यातील लढाऊ बाणा हरपला आहे. ते कशी तरी आपली भूमिका मांडत आहेत. पण त्यांच्या या भूमिकेची दखल आता मीडियाही घेत नाही, असे सिन्हा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या