पाकिस्तानसाठी हेरगिरी भोवली; सीआरपीएफ जवानाला अटक

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी एनआयएने सीआरपीएफ जवानाला अटक केली आहे. मोती राम जाट असे जवानाचे नाव असून त्याला दिल्लीतून अटक करण्यात आली. 2023पासून सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान, हरयाणाची युटयूबर ज्योती मल्होत्राला आज हिसार न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली.